HW News Marathi
देश / विदेश

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

मुंबई | पनामा पेपर लीक प्रकरणी ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ऐश्वर्याला आज (२० डिसेंबर) तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.  चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती प्रसार माध्यमांकडून मिळाली आहे. याआधी ऐश्वर्याला यापूर्वी दोन वेळा ईडीकडून समज बजावले होते. या प्रकरणी ऐश्वर्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू यांची चौकशी करत आहे. ऐश्वर्या राय ईडी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती प्रसार माध्यमांकडून मिळाली आहे. 

या प्रकरणी गेल्या वर्षी एका लॉ फर्मने गोपनीय कागदपत्रे लिक केली होती. यात जवळपास ५०० भारतीय व्यक्तींचे परदेशी बँकेत खाते असल्याचे उघड झाले होते. यात देशातील मोठमोठ्या व्यक्तींनी त्यांचा काळा पैसा गुंतवला होता. यामुधेय देशातील बेडे राजकीय नेते, उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटी यांचे देखील नावे आहेत. 

२०१६ मध्ये ब्रिटनमध्ये पनामा लॉ फर्मचे ११ कोटी कर कागदपत्रे लीक झाले होते. यात जगभरातील ५०० बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची समोर आली होती. यात बच्चन कुटुंबाचे नाव देखील समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांच्या ४ कंपन्याचे संचालक बनवण्यात आले होते. १९९३ मध्ये कंपनी तयार केली होती. या कंपनीचे भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलर्सच्या जवळपास होते. मात्र, या कंपन्या जहाज व्यवसाय करत होत्या. त्यांची किंमत ही कोट्यावधीच्या घरात होती. यपैकी एका कंपनीचे ऐश्वर्याला डायरेक्टर बनविले होते. या कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न – प्रवीण तोगडिया

swarit

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

News Desk

१८ तारखेला काढणार मोर्चा

News Desk