HW News Marathi
देश / विदेश

भारत हिंदूमुक्त करण्याची अल कायदाची धमकी

नवी दिल्ली – अल कायदाचा दहशतवादी जाकीर मुसा याने पुन्हा दर्पोक्ती केली आहे. गोपूजक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून भारताला मुक्तकरण्याची धमकी देणारा व्हिडिओ त्याने जारी केला आहे. बकरी ईदच्या दोनच दिवस आधी त्याने दहा मिनिटांचा हा व्हिडिओ जारी केला आहे.

जाकीर मुसा हा अल कायदाच्या गजवा-ए-हिंद सेलचा प्रमुख आहे. यापूर्वी तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत कार्यरत होता. ‘अंसर गजवा’ या युट्यूब चॅनलवरून त्याने ही धमकी दिली आहे. या व्हिडिओत त्याने भारताविरोधात आगपाखड केली आहे. गोपूजक नरेंद्र मोदी राजकारण आणि कुटनितीद्वारा अनेक लोकांना गोळा करू शकतात. पण ते आम्हाला रोखू शकत नाही. आम्ही भारतावर इस्लामी झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आमचा प्राण त्यागणार नाही, असेही तो म्हणाला आहे. जम्मूतील रोहिंगे मुस्लिमांच्या प्रश्नावरूनही त्याने ही धमकावणी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा घेतली शपथ

Aprna

Breaking News | केरळच्या सबरीमाला मंदिरात आता महिलांनाही प्रवेश

News Desk

उत्तर प्रदेशात भारतीय वायू सेनेचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले

News Desk