HW News Marathi
देश / विदेश

गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडेला अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात असते. परंतु हिंदू महासभेच्या पूजा पांडेने गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. गांधींच्या हत्येचा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक केले आहे.

उत्तर प्रदेशातील अलीगड येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी बुधवारी (३० जानेवारी) हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेय यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. इतकेच नव्हे तर यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्राला हार अर्पण करून मिठाई वाटत ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’ च्या घोषणाही देण्यात आला. इतकेच नाही तर हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. ”महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.”असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेयने केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद

News Desk

देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही | शरद पवार

News Desk