मुंबई | बहुचर्चित सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर आज (२१ डिसेंबर) निकाल लागला आहे. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी पुराव्यांअभावी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने या प्रकरणातील सर्व २२ आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला आहे. २००५-०६ साली झालेल्या या एन्काउंटरमध्ये कथित गँगस्टर सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती हे दोघे जण मारले गेले होते. या एन्काउंटरनंतर देशातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते.
Sohrabuddin Sheikh case: All 22 accused acquitted by Special CBI Court in Mumbai due to lack of evidence pic.twitter.com/CSdFvx7f4w
— ANI (@ANI) December 21, 2018
या एनकाउंटर प्रकरणात एकूण ३७ जणांना आरोपी घोषित करण्यात आले होते. २०१४ मध्ये या ३७ आरोपींपैकी १६ जणांची मुक्तता करण्यात आली होती. या मुक्तता करण्यात आलेल्या लोकांच्या यादीत तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री आणि विद्यमान भाजप अध्यक्ष अमित शाह, पोलीस ऑफिसर डी.जी.बंजारा यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात हे प्रकरण गुजरातमध्ये सुरु होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्यात आले. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
Special CBI Court: Govt machinery and prosecution put in a lot of effort, 210 witnesses were brought but satisfactory evidence didn't come and witnesses turned hostile. No fault of prosecutor if witnesses don't speak https://t.co/BjjlLhZ0PY
— ANI (@ANI) December 21, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.