नवी दिल्ली | सरकारच्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तान वारंवार भारताविरोधात कुरघोड्या करीत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जम्मू काश्मीरमधील भारतीय सैन्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्य, हवाई दल, सुरक्षा यंत्रणांना भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जम्मू-काश्मीरमधील काही सेवांवर निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील हे निर्बंध सोमवारपासून (१९ ऑगस्ट) शिथिल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.
SRINAGAR- All Indian Army, Air Force and security forces’ bases in Jammu&Kashmir asked to be on high alert against possible attempt by Pakistan-backed terrorist groups to carry out attacks in view of Pakistani efforts to create disturbances in the Kashmir valley: Official Sources pic.twitter.com/bRhfRZtL7S
— ANI (@ANI) August 16, 2019
काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी केंद्राकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते तर राज्यातील सुरक्षेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. दरम्यान, आता अखेर येत्या सोमवारपासून काश्मीरमधील निर्बंध काहीसे शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती त्याचप्रमाणे दूरध्वनी, इंटरनेट, टी.व्ही. केबल सारख्या सर्व बंद ठेवण्यात आल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.