HW Marathi
देश / विदेश

आलोक वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

नवी दिल्ली | आलोक वर्मा यांनी आज (११ जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वर्मा यांना गुरुवारी (१० जानेवारी) सीबीआयच्या संचालक पदावरून हटविण्यात आले होते. सिलेक्ट कमिटीच्या  बैठकीत वर्मा यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २-१ अशा बहुमताने हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर वर्मा यांना होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि अग्निशमन सेवा यांचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या नियुक्तीवर वर्मा यांनी नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे.

या सिलेक्ट कमिटमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुचविलेले न्यायाधीश ए. के सिकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते मलिक्कार्जुन खरगे  यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांना मंगळवारी(८ जानेवारी) सक्तीच्या रजेवरून पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. वर्मा यांना  ज्याप्रकारे सीव्हीसीने (केंद्रीय दक्षता आयोग) सीबीआयच्या संचालक पदावरून हटविले, ते संविधानाच्या विरुद्ध आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केले होते.

 

Related posts

पाकिस्तान कडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष ठरणार देशाचे पहिले लोकपाल ?

News Desk

पेट्रोल-डिझेल किंमतीत सलग सहाव्या दिवशी घट

अपर्णा गोतपागर