नवी दिल्ली | गेले अनेक दिवस शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १३ शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. इंडियन कॉन्सिल ऑफ अँग्रिकल्चर रिसर्चच्या अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस राकेश टिकैत, गुरनाम चढूनी, हनन मुल्ला, शिवकुमार कक्का, बलबीर सिंग, जगजीत सिंग दल्लेवाल, रुलदू सिंग मानसा, मंजित सिंग राय, बुटासिंग बुर्जगिल, हरिंदरसिंग लखोवाल, दर्शन पाल, कुलवंत सिंग संधू, बोध सिंग मानसा आदी १३ नेते सहभागी झाले होते. साधारणपणे अडीच तासाहून अधिक काळ ही बैठक चालली. शहा यांनी गेल्या १२ दिवसांत प्रथमच आंदोलकांशी थेट संवाद साधला आहे.
No meeting will be held between farmers & govt tomorrow. The minister has said that a proposal will be given to the farmer leaders tomorrow. Farmer leaders will hold a meeting over govt's proposal: Hannan Mollah, General Secy, All India Kisan Sabha pic.twitter.com/M1lItQ1kGg
— ANI (@ANI) December 8, 2020