HW News Marathi
देश / विदेश

लष्करचा कमांडर बशिराचा खेळ खल्लास !

काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लश्करीसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गेल्या महिन्यात काश्मीरमधील सहा पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यामध्ये बशीर लश्करीही होता.

अनंतनागमधील ब्रेन्ती गावात दहशतवादी लपल्याचे कळताच सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती. तेव्हा, एका घरात बशीर लश्करीसह तीन दहशतवादी लपल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर, जवानांनी त्यांना घेरले आणि त्याचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी काही नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला, तर काही स्थानिक रहिवाशांनी जवानांच्या कामात अडथळे आणले. परंतु, या कशालाही न जुमानता लष्कराने लश्करी आणि त्याच्या साथीदाराचा खेळ खल्लास केला. बुरहान वानी, सबजार अहमद भट्ट यांच्यापाठोपाठ लश्करीला ठार करून जवानांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असताना दोन नागरिकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फाॅलो करा https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट

Gauri Tilekar

अशोक चव्हाण दिल्लीत दाखल, ‘या’साठी चव्हाणांची दिल्लीवारी

News Desk