HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : देशहितासाठी घेतलेल्या निर्णायचे ज्योतिरादित्य शिंदेंनी केले समर्थन

नवी दिल्ली | कलम ३७० आणि जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये आज (६ ऑगस्ट) मंजूर झाले आहे. हे विधेयक लोकसभेत ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर झाले आहे. विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडल्यानंतर काँग्रेसनेच्या अनेक नेत्यांनी विरोद्ध केला तर काही नेत्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणार काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

कलम ३७० बाबत ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक ट्विट करत म्हटले की, “जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत उचलण्यात आलेली पावले आणि भारतामध्ये त्यांच्या पूर्णपणे करण्यात आलेल्या विलीनीकरणाचे मी समर्थन करतो. मात्र यासाठी घटनात्मक प्रक्रियेचे पूर्ण पालन केले गेले असते तर अधिक चांगले झाले असते. तसे झाले असते तर काही शंका उपस्थित झाल्या नसत्या. मात्र हा निर्णय देशहितादृष्टीने घेतल्यामुळे मी या विधयेकाला पाठिंबा देत आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचं निधन

News Desk

भारत-रशिया रायफल्स करार, अमेठीत उभारणार रायफल्सचा कारखाना

News Desk

तब्बल 150 वर्ष ‘इथे’ होळी साजरी झालीच नाही; धक्कादायक कारण आलं समोर

Manasi Devkar