HW News Marathi
देश / विदेश

चोरी झाली म्हणून ‘ती’ आलिशान बंगलाच विकणार

 

न्यूयॉर्क : हॉलिवूड अभिनेत्री स्टार केंडर जेनर तिचा हॉलिवूड हिल्सहा आलिशान बंगला एका शुल्लक कारणासाठी विकत आहे. ते कारण आहे, मार्च महिन्यात बंगल्यात झालेल्या चोरीचे! मार्चमध्ये चोरट्यांनी बंगल्यातून सुमारे एक कोटी रुपयांची ज्वेलरी चोरून नेली होती. तेव्हापासून केंडर खूपच निराश आहे. अखेर तिने हा बंगलाच विकण्याचा निर्णय घेतला आहे.

केंडलने हा महाल ४१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. ४,८०० चौफूट परिसरात असलेला हा आलिशानबंगला विंटेज स्टाइल आहे. केंडलने हा बंगला जॉन क्रासिंस्की आणि एमिली ब्लंट यांच्याकडून जून २०१६ मध्ये खरेदी केला होता. या बंगल्यात सहा बेडरुम्स, पाच बाथरुम्स आहेत. महालातील सर्वच रूम वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट केल्या आहेत. प्रत्येक खोलीत वेगवेगळ्या प्रकारचे सोफे आहेत. वुडन फ्लोर आहे, लिव्हिंग रुममध्ये फायर प्लेस आहे. घराच्या कॅम्पसमध्ये खूप मोठा पूल आहे. त्याचबरोबर बसण्यासाठी एक मोठी स्पेशल स्पेस आहे. पुलाजवळ सीटिंग चेअर आणि व्हिंटेज स्टाइल खुर्च्या आणि सोफे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान प्रवासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणास अटक

News Desk

कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

swarit

डिझेल पुन्हा ९ पैशांनी महागले

Gauri Tilekar