HW News Marathi
देश / विदेश

१०७ आमदारांच्या उपस्थितीत झाली बैठक, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन

राजस्थान | राजस्थान सरकारमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे.आज मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी निवासस्थानी बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले. या बैठकीत गेहलोत यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांसोबतचं केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले काँग्रेस नेतेही दिसले. काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभे राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले.

 

जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे, राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन उपस्थित होते. या बैठकीला १०७ आमदार उपस्थित राहिल्याने अशोक गेहलोतही सरकारबाबत समाधानी दिसले. यावेळी त्यांनी व्हिक्टरी साईनही दाखवले आहे.सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार, भाजपसोबत एकमत न झाल्याने काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या समर्थनात गेलेले २४ पैकी जवळपास अर्धे आमदार पुन्हा निसटले आहेत.अद्यापही १२ काँग्रेसचे आणि ३ अपक्ष आमदार पायलट यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार मात्र बैठकीसाठी आले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी मागितली

News Desk

शरजीलच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk