HW News Marathi
देश / विदेश

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

नवी दिल्ली | अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील देशांमधील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. तसेच या यादीमध्ये भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांना धार्मिक दहशवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. या दोन्ही संघटना धार्मिक दहशतवादी संघटना (Militant Religious Organization) असल्याचे सीआयएने घोषित केली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (Nationalist Organization) असे देखील म्हटले आहे. यामध्ये विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा यात समावेश आहे.

तसेच ठराविक विचारसरणीचा अवलंब करणाऱ्या संघटनांना कट्टरतावादी किंवा दहशतवादी संबोधल्यामुळे बजरंग दल आणि विहिंपने दहशतवादी शिक्का हटवा नाही. तर आम्ही कायदेशीर कारवाई करु, असा इशारा या दोन्ही संघटनांनी सीआयएला दिला आहे.

सीआयएने जाहीर केलेल्या यादी भारतातील अजून ७ संघटनांचा समावेश आहे. सीआयएने त्यांना विविध श्रेणीमध्ये ठेवले आहे. यात जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समावेश केला आहे.

 

Related posts

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

Aprna

ओबामा, बिल गेट्स यांच्यासह दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक 

News Desk
महाराष्ट्र

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

News Desk

मुंबई | विहीरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ बनवणे ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. भाजपचे सरकार आल्यापासून देशात आणि राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. भाजपची दलित विरोधी मनुवादी विचारधारा याला कारणीभूत आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

देशात भाजपचे सरकार आल्यापासून दलित अल्पसंख्यांक आणि आदिवासींवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. ऊना येथील दलितांवरील अत्याचार, रोहित वेमुला प्रकरण तसेच घोड्यावर बसले म्हणून मारहाण, मिशा वाढवल्या म्हणून मारहाण असे अत्यंत घृणास्पद प्रकार घडले आहेत. पण सरकार या प्रकारांतील दोषींवर कारवाई करीत नाही हे दुर्देव आहे. अनेक वर्ष काँग्रेसच्या विविध सरकारांनी देशातील जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले परंतु गेल्या चार वर्षात देशाला मागे घेऊन जाण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. त्यांच्या मनुवादी विचारधारेचे भयंकर दुष्परिणाम सामाजिक सलोख्यावर होत आहेत.

माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पथक जळगाव जिल्ह्यातील जामवाकडी ता. जामनेर गावी तात्काळ जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच पोलीस अधिका-यांना भेटून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. या पथकात माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी खा. व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश असेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली.

 

Related posts

घोटाळयाचा तपास की तपासात घोटाळा ?

News Desk

नितेश राणेंना आणखी एक धक्का; सहकार विभागाने राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला

Aprna

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिद्दीने यशस्वी होण्याचे आवाहन;बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

News Desk