HW News Marathi
देश / विदेश

बँक कर्मचारी आज देशव्यापी संपावर

नवी दिल्ली | विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण आणि वेतन कराराला होत असलेला विलंब अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आज (२६ डिसेंबर) एक दिवसीय लाक्षणिक संपावर पुकारला आहे. देशभरातील दहा लाखाहून अधिक बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. एका आठवड्यातील कमी कालावधीतील हा दुसरा संप आहे.

सरकारी बँकांच्या अधिकारी संघाने मागील शुक्रवारी(२१ डिसेंबर) संप पुकारला होता. विलिनीकरण आणि वेतन कराराबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी त्यांनी संप केला होता. आज पुन्हा संघटनांनी संप पुकारला असून या संपात खासगी बँकांची सेवा सुरळीत सुरु राहणार आहे. बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारला आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्‍तान भारताच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद करणार ?

News Desk

लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही – ट्रेडोस

News Desk

पाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत

News Desk