HW News Marathi
देश / विदेश

बाप्पा झाले ‘जीएसटी’ मुक्त

नवी दिल्ली | पावसाळा सुरू होताच वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे! गणेशोत्सवासाठी आतापासून मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु यावेळी वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचा मोठा फटका मूर्तिकारांना बसणार होता. जीएसटीमुळे शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात वाढ होते. आणि त्यामुळे मूर्तींच्या किमतीत ३० ते ३५ टक्के वाढ होते. विशेष म्हणजे यंदा बाप्पाचे आगमन थोडे लवकर होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळते आहे.

परंतु, केंद्र सरकारने आगामी रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यंदा रक्षाबंधनातील राखी आणि गणेशोत्सवातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसह सर्व प्रकारचे पुतळे, हस्तकलेच्या वस्तू, हातमागासह इतर वस्तूंना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. या सणांचा हा आपला वारसा आहे. तो आपण जपून ठेवायला हवा, असेही गोयल यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

News Desk

भारत-रशिया रायफल्स करार, अमेठीत उभारणार रायफल्सचा कारखाना

News Desk

‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे !

News Desk
मुंबई

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

News Desk

मुंबई । येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’च्या पाचव्या पर्वामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी दोन हजार समर्थक धावणार आहेत. जे धावूच शकत नाहीत, त्यांनी किमान १२ मिनिटे तरी धावावे, यासाठी ‘वेलनेस ओव्हर इलनेस ’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. ऐंशी वर्षांचे डॉ. पी. एस्. रमाणी हे या ‘रन’चे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून ते स्वत: १२ तास धावणार आहेत.

धावण्याच्या या कालावधीत धावपटूंना त्यांच्या गरजेनुसार खाण्यापिण्याची आणि काही काळ विश्रांती घेण्याची देखील मुभा राहणार आहे. १२ तासांचे हे अंतर ४२.२ किलोमीटरचे आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मॅरेथॉन रनचा सायंकाळी पाच वाजता समारोप अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला पदक देण्यात येणार आहे. धावपटूंना आवश्यकता भासल्यास उपाचारासाठी धावण्याच्या मार्गांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि १०८ रुग्णवाहिकाही असणार आहेत.

‘एडलवाइज ग्रुप’चे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेतील प्रवेश शुल्काचा निधी कर्करोगग्रस्तांवर उपचार करर्‍यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’चे संचालक सॅविओ डिसोझा यांनी सांगितले. रेसच्या वैद्यकीय संचालिका गायत्री ठाकूर यांनी सांगितले की, धावण्याच्या वेळी एखाद्याला थकवा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्पर्धेतून माघार घेणे बंधनकारक राहील. यावेळी उषा सोनम यांनी धावण्याऐवजी चालत का होईना, पण स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related posts

राज ठाकरे यांना विकास कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे आव्हान

News Desk

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एसी डकमध्ये लागली आग

swarit

यंदा चक्क श्रींच्या एवढ्या मुर्तींचे झाले विसर्जन !

swarit