HW News Marathi
देश / विदेश

स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांची भरारी

बेंगळुरू | स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून आज (१९ सप्टेंबर) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केली आहे. तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण करमारे देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत. भारताचे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) पाकिस्तान आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा वरचढ ठरत आहे. तसेच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने तेजस विमानाची डिझाइन केले आहे. तर हिंदुस्तान अ‍ॅरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे.

तेजसमधून उड्डाण केल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, ”तेजसमधून उड्डाण करणे खूप सुखद अनुभव असून हे विमान उत्तम आणि आरामदायक असल्याचे ते म्हणाले. मी या उड्डाणाचा आनंद घेतला आहे. तेजस या लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो असल्याचा अभिमान आहे.”

स्वदेशी बनावटी तेजस लढाऊ विमानाची वैशिष्य

भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान आहे. या विमानाची संकल्पना १९८३ मध्ये समोर आली होती. त्यानंतर दहा वर्षांनी १९९३ मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड (HAL) या कंपनीने केली आहे. तेजस हे लढाऊ विमान शत्रूवर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे.

या विमानाची वैशिष्य म्हणजे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे लढाऊ विमान सक्षम असल्याचे एअर चीफ मार्शल धनोआ यांनी सांगितले. लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस वजनाने हलका असून त्यांचे वजन साधारण ६५६० किलो असून ५० हजार फूट उंचावर उड्डाण करू शकते. तर पंख ८.२ मीटर रुंद आहेत. आणि लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

गाढ झोपलेल्या तरुणाला मृत समजून हलवले रुग्णालयात

News Desk

राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार, १५ मंत्री घेणार शपथ

News Desk