HW News Marathi
देश / विदेश

जुलै महिन्यात दीड लाख शाखांची पोस्टल बँक होणार सुरू

नवी दिल्ली | जुलै महिन्यात टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही बॅंक जगातील सर्वांत मोठी बँक असणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून १५ दिवसांत टपाल खात्याला बँकिंगची परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी माहिती ही माहिती दिली आहे.

सिन्हा यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. ती मिळाल्यानंतर १५ दिवसांत एक डझनाहून अधिक पोस्टल बँक शाखा सुरू होतील. ही अशी बँक असेल की जिच्या १ लाख ३३ हजारांहून अधिक ब्रँच व एक्सेस पॉइंट ग्रामीण भागांत असतील. सध्या २३ हजार टपाल कार्यालयांत बँकिंगसाठी आवश्यक असणारी सीबीएस म्हणजेच कोअर बँकिंग सिस्टिम आहे.

सध्या पोस्टल बँकेच्या रायपूर व रांची या दोनच शहरांत शाखा असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी ६५० शाखा सुरू होतील. त्यानंतरच्या दीड वर्षात दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांत एक्सेस पॉइंट व एक्स्टेंशन शाखा सुरू झालेल्या असतील. शिवाय ९९५ एटीएमही बसवण्यात आले आहेत. देशातील १0 हजार गावांत प्रत्येक घराला मार्च २0१९पर्यंत विमा योजनेशी जोडण्याचे लक्ष्य टपाल खात्याने ठरवले आहे. आतापर्यंत १२४४ गावांत हे काम पूर्ण झाले आहे, असे मनोज सिन्हा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! – नाना पटोले

Aprna

९ हजार ७४६ बोगस मतदान ओळखपत्र जप्त

News Desk

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

Arati More