नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर काल (१४ मे) चर्चा केली. तसंच यावेळी मोदी यांनी कोरोनाविरोधात भारताने केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली होती.
कोरोनाच्या संकटाने जागतिक स्तरावर निर्माण होणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल,” अशी अपेक्षा बिल गेट्स यांनी व्यक्त केली. तर यापूर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “करोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे,” असे म्हटले होते.
Thank you for the conversation & partnership PM Narendra Modi. Combating the pandemic requires global collaboration. India’s role is key as the world works to minimize social & economic impact, and pave the way to vaccine, testing, and treatment access for all: Bill Gates (file) https://t.co/lKqXL8Unn9 pic.twitter.com/eREJqxBO0A
— ANI (@ANI) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.