HW News Marathi
देश / विदेश

मलिकार्जुन खरगेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार मलिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात हा थेट सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान, मल्लिकार्जून खरगे एका पत्रकार परिषदेत एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वांदग निर्माण झाला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून तुम्ही राहुल गांधींच्या विरोधात उभे राहणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी खरगेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडू देत. बकरी ईदला वाचलो तर मोहरमला नाचू अशी एक म्हण आहे. आधी आमचं मतदान होऊ देत, मला अध्यक्ष होऊ द्या, त्यानंतर आपण यासंबंधी बोलू.”

 

खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी आक्षेप घेत त्यांनी टीका केली आहे. शेहजाद म्हणाले, ‘मोहरम’ हा उत्सव नसून शोक आहे. हा मुस्लिमांसाठी एक मोठा अपमान आहे.” शेहजाद पुनावाला यांनी ट्विटरद्वारे एक व्हिडिओ शेअर केला, या व्हिडिओमध्ये त्यांनी खरगेंचा उल्लेख करत गांधी कुटुंबांचे प्रॉक्सी उमेदवार म्हणून केला आहे. आणि एक व्हिडिओ पोस्ट केला असून हे फार आक्षेपार्ह विधान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘मोहरम ‘ हा मुस्लिम बांधवांचा एक धार्मिक सण आहे. जरी खरगे यांनी याचा उल्लेख एक म्हण म्हणून केले असला तरी भाजपच्या नेयांकडून खरगे यांना धारेवर धरण्याची कुटलीही संधी सोडणार नाही,’ असे ते म्हणाले.

 

तसेच सध्या राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. तर दुसरीकडे खरगेंच्या या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता असून राहुल गांधींच्या यात्रेवर याचा काय परिणाम होईल. हे येत्या दिवसांत पाहावे लागेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्यांचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयात! समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर

News Desk

‘यूपीएससी’ ने देखील नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली!

News Desk

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसच्या ३ डब्यांना भीषण आग

News Desk