HW News Marathi
देश / विदेश

महिलेला निर्वस्र करून भाजप नगरसेवकाचा कहर..

सूरत – गुजरातमध्ये भाजपच्या नगरसेवकाने एका महिलेला महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली आहे. याप्रकरणी नगरसेवकासह त्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा नगरसेवक फरार झाला आहे. तर त्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. प्रवीण कहर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, भाजपा नगरसेक प्रवीण कहर मात्र घटनेनंतर फरार आहेत. आपल्या जावयासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवक प्रवीण कहर यांनी आपल्या पुतण्यांसोबत मिळून महिलेला जबर मारहाण केली. मंगळवारी ही घटना घडली.

वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक असणारे प्रवीण कहर आपल्या पुतण्यांसोबत मिळून रंडेर परिसरातील महिलेच्या घरात जबरदस्ती घुसले. यावेळी त्यांचा जावई जयेश टेलरदेखील तिथेच होता. नगरसेवक आणि त्याच्या पुतण्यांनी सर्वात आधी महिला आणि जयेश टेलर यांना घराबाहेर खेचत आणलं आणि जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपी त्यांना नानपुरा क्रॉसरोडला घेऊन गेले आणि परत मारहाण कऱण्यास सुरुवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पडेल या आशेने चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात !

News Desk

दीड लाख लोक मंगळवार जाणार

News Desk

कर्नाटक निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात….

News Desk