नवी दिल्ली | संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उद्या (५ ते ८ फेब्रुवारी) पुढील सलग तीन दिवस उपस्थित राहण्यासाठी भाजपने त्यांच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. याआधी काँग्रेसने त्यांच्या लोकसभा खासदारांना आज (४ ते ८ फेब्रुवारी ) या दरम्यान उपस्थित राहण्यासाठी खासदारांना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्हीप जारी केले आहे. सध्या संसदेत सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणि अर्थसंकल्पासाठी या पार्श्वभूमीवर हे व्हीप बजावण्यात आले आहेत.
BJP has also issued whip for its Lok Sabha MPs, asking them to be present in the House on February 5 and 7. #BudgetSession https://t.co/pk8ttG7RnQ
— ANI (@ANI) February 4, 2019
पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलीस यांच्यातील वादाचे पडसाद आज (४ फेब्रुवारी) लोकसभेत देखील उमटले आहेत. या वादानंतर लोकसभेत मोठा गदारोळ माजला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन द्यायला सुरुवात केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात “सीबीआय तोता है” अशी घोषणाबाजी केली. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.