नवी दिल्ली । उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे शुक्रवारी झालेल्या अॅपच्या एरिया मॅनेजरला विवेक तिवारी याच्या हत्येनंतर सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरून राजकीय पातळीवरही चर्चा आणि आरोपांचं सत्र सुरू झालं आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खळबळजनक ट्वीट केलं आहे. भाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करून संबंध भारतभर फिरत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अॅपलच्या एरिया मॅनेजरला गोळी झाडून मारलं होतं. त्यामुळे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Spoke to his wife on phone just now…. https://t.co/veB9Mijwbv
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 30, 2018
केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “विवेक तिवारी तर हिंदू होता, मग त्याला का मारलं? भाजपचे नेते तर सगळ्या देशात हिंदू तरुणींवर बलात्कार करतात. आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करा. भाजप हिंदुच्या हितासाठी नाहीये. सत्तेसाठी जर त्यांना हिंदुंना मारावं लागलं तर ते दोन मिनिटं सुद्धा विचार करणार नाहीत” असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी अॅपल कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी हे आयफोन लाँचिंगचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या कारने घरी जात होते. पोलिसांनी त्यांची कार थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळी विवेक तिवारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याने थेट विवेक यांच्या डोक्यात गोळी घातली, असा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर होत आहे. तर दुसरीकडे, कार चालवणारा तरुण संशयित वाटत होता. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. उलट पोलीस कॉन्स्टेबलच्या बाईकवर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्याने कार पुढे नेली. तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. कार विजेच्या खांबावर आदळली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.