इंदूर | मध्य प्रदेशातील इंदूर येथे जुन्या जीर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्याला स्थानिक भाजप आमदार स्थानिक आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे आमदार भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आहे. आकाशच्या समर्थकांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी आकाशसह आमदारासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाशला अटक करण्यात आली असून मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे.
#WATCH BJP MLA Akash Vijayvargiya (son of senior BJP leader Kailash Vijayvargiya) being taken to court, after he was arrested for thrashing a Municipal Corporation employee in #Indore. #MadhyaPradesh pic.twitter.com/RxWsHGDPrN
— ANI (@ANI) June 26, 2019
इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत.
#UPDATE BJP MLA Akash Vijayvargiya has been arrested for thrashing a Municipal Corporation officer in Indore. https://t.co/qDM5b35ypy
— ANI (@ANI) June 26, 2019
नेमके काय आहे प्रकरण
जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांना १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल, त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.