HW Marathi
देश / विदेश राजकारण

… तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही !

मुंबई | लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात सरेंडर मोदी आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी आज (२१ जून)  ट्वीटकरून केली आहे. आणि राहुल गांधींनी भारताचे चीनबरोबरचे सध्याची धोरण शांततेचे आहे, असे शिर्षक असलेला जपान टाइम्सचा एक लेख ट्वीट केला आहे.  मोदींवर केलेल्या  टीकेमुळे भाजपचे नेत्यांनी राहुल गांधींच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. शाहनवाझ हुसेन म्हणतात,  “काँग्रेस नेता राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत असून ही बाब देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात ‘सरेंडर मोदी’ | राहुल गांधी

 

Related posts

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

rasika shinde

२१ मे ला विधान परिषदेच्या ६ जागांसाठी होणार निवडणूक

News Desk

पुणे प्रशासनाकडून ७५ नवे मायक्रो कंटेंटमेंट झोन जाहीर

News Desk