HW News Marathi
देश / विदेश

आयुष्यभर काँग्रेस नेते गांधी कुटुंबियांची ‘गुलामीच’ करणार

मुंबई | काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची काल (१० ऑगस्ट) निवड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कोणत्याही नेत्यांच्या नावावर एकमत न झाल्यामुळे सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षपदाची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपद भूषविणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून राजकीय वर्तुळ अनेक काँग्रेस नेत्यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु सोनिया गांधी यांच्या निवडनंतर काँग्रेसवर विरोधीपक्ष टीका करत आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असे मत राहुल गांधींनी मांडले असून देखील पुन्हा एकदा गांधी घराण्याचा अध्यक्ष झाल्याने काँग्रेसवर भाजपचे आयटीसेल प्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीटवर एक व्हिडिओ पोस्ट करून टीका केली आहे. या व्हिडिओला “टू काँग्रेस व्हथ लव्ह…,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

मालवीय यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सात सेकंदाचा असून या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकाता गुलागिरीसारखी असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘मायलेकांची गुलामीच’ करत राहणार अशी अप्रत्यक्ष टीका करणारा व्हिडिओ मालवीय यांनी पोस्ट केला आहे. मालवीया यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ या हिंदी सिनेमातील एक क्षण आहे. हा सिनेमा आणीबाणीवर आधारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk

राहुल गांधी यांनी पुन्हा डागले मोदींवर टीकास्र

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे एक वेगळाच विक्रम !

News Desk