नवी दिल्ली | आसाममध्ये एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या ब्लास्टमध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा बॉम्ब स्फोट आसाममधील हरसिंगा रेल्वे स्थानकात झाला आहे. हा ब्लास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या एका कोचमध्ये झाला आहे. या स्फोटाची तीव्रता कमी असल्याची माहिती प्रथम दर्शनी वर्तविण्यात येत आहे.
ब्लास्ट ची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. रेल्वेचे मुख्य अधिकारी देखील घटना स्थळी हजर झाले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा स्फोट कामाख्या डेकारगांव इंटरसिटी एक्स्प्रेस मध्ये झाला आहे. आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 11 लोक जखमी झाले आहेत.
डीआयजी अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलेले आहे. पोलीस सदर घटनेचा तपास घेत आहेत.
Police say on 11 persons injured in an explosion inside Kamakhya-Dekargaon Intercity Express in Udalguri, "explosion took place in the running train at around 6:45 pm. Investigation underway to ascertain if it was a bomb". #Assam pic.twitter.com/417XW5PDpk
— ANI (@ANI) December 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.