HW Marathi
देश / विदेश राजकारण

केंद्रिय कर्मचाऱ्यांची दसऱ्यापासूनच दिवाळी सुरू होणार!

नवी दिल्ली |  अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, तात्काळ बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दसऱ्यापासूनच दिवाळी सुरू होणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

जावडेकर म्हणाले की, दसऱ्याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(डीबीटी)द्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅबिनेटमध्ये आज २०१९-२० साठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस(पीएलबी) आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ३० लाख विना-राजपत्रित  कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

रेल्वे, टपाल, संरक्षण उत्पादन, ईपीएफओ, ईएसआयसी या सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विनाराजपत्रित १७ कर्मचाऱ्यांना २ हजार ७९१ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित १३ लाख कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिविटी लिंक्ड बोनस मिळेल. त्यांना ९०६ रुपये बोनससाठी मिळतील. म्हणजे या आठवड्यात ३० लाख कर्मचाऱ्यांच्या हात ३ हजार ७३७ कोटी रुपये अधिक असतील. बाजारात मागणी वाढेल व सणासुदीच्या काळात मध्यवर्गीयांच्या हाती पैसा येईल.

Related posts

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

News Desk

पंढरपूर पोटनिवडणूक: भाजपकडून समाधान अवताडेंना उमेदवारी,आज अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची फौज येणार

News Desk

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेत आणखी २२ जागा सील करणार

News Desk