HW News Marathi
देश / विदेश

इंग्लंडच्या राजपुत्राला डब्बेवाल्यांकडून कंबरपट्टा, तोडे आणि वाळ्यांची भेट

ब्रिटन | इंग्लंडच्या राज घराण्यात एक लनग्याचे नुकतेच आगमन झाले आहे. ब्रिटनचा ड्यूक ऑफ डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांना ६ मे रोजी पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. राजघराण्याच्या राजपुत्राची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. यानंतर मेगन,प्रिन्स हॅरी बाळासह विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज हॉलमध्ये आलेत आणि प्रसार माध्यमांना राजपुत्राचे मुखदर्शन दिली.

इंग्लंडच्या राजपुत्राच्या जन्माच्या बातमी मुंबईच्या डब्बेवाल्याचा आनंद देखील गगनात मावेना असे झाले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा मित्र प्रिन्स चार्ल्स यांच्याशी जुने ऋणानुबंध तसे फार आहेत. डब्बेवाल्यांनी हॅरी आणि मेगन यांच्या राज पुत्राला महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने दिले आहेत. डब्बेवाल्यांनी चांदीचे कंबरपट्टा, हातातील तोडे आणि पायातील वाळे या भेट वस्तू देणार असल्याचे मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे. या भेट वस्तुने महाराष्ट्राची परंपरा वसली असून या गोष्टी आजोबांकडून नातवाला दिल्या जातात.

ब्रिटनच्या राजघराण्याच्या गादीचा सातवा दावेदार म्हणून जन्मास आलेल्या या रॉयल बेबीला ‘आर्ची’ नावाने ओळखले जाईल. त्याच्या नावापुढे आर्ची हॅरिसन माऊंट बेटन विंडसर हे विशेषनामही जोडण्यात आले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या १९ मे २०१८ रोजी यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यावेळी या दोघांच्या लग्न सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी डबेवाल्यांनी हॅरीसाठी कुर्ता-पैशामा आणि फेटा तर मेगनसाठी पैठणीसाडी-चोळी आवर्जुन मराठमोळा आहेर त्यांना पाठवला होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये मिनिबस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू

swarit

#DelhiResult : ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार !

swarit

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

Chetan Kirdat