HW News Marathi
देश / विदेश

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात घेऊन जाण्यासाठीचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेच्या (इस्रो) ‘गगनयान’ मोहिमेला शुक्रवारी (२८ डिसेंबर) मंजुरी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत ३ अंतराळवीरांना पृथ्वीच्या सर्वात शेवटच्या कक्षेत पाठविण्यात येणार आहे. या संपूर्ण योजनेवर जवळपास १० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे.

इस्रोने भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात पाठविण्यासाठी ‘गगनयान मोहीम’ आखली आहे. या मोहिमेतर्गंत ३ अंतराळवीर ७ दिवस अंतराळात जाणार आहेत. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या ७ दिवसांमध्ये तेथील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग घेण्यात येतील, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी “२०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल”, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली होती. भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात घेऊन जाणे हे इस्रोचे लक्ष्य असून ‘या मोहिमेद्वारे देशभरात १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे’, अशी माहिती देखील इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध! – उपमुख्यमंत्री

Aprna

जाणून घ्या…जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३५ अ’ आणि ‘कलम ३७०’

News Desk

“केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे फायद्याचेच”,राष्ट्रपतींनी केली पाठराखण

News Desk