गुजरात | अहमदाबादमध्ये ऑनलाइन डिलिव्हरीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. चलनातील नोटांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ऑनलाइन डिलिव्हरीसाठी कॅश व्यवहारावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅश व्यवहार न करता फक्त डिजिटल पेमेंट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अहमदाबाद महापालिकेने काल (११ मे) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅपही बंधनकारक करण्यात आले आहे. डी मार्ट, बिग बास्केट, बिग बाजार, ओसिया हायपरमार्केट, झोमॅटो, स्वीगी या होम डिलिव्हरी करणाऱ्या मुख्य कंपन्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के स्क्रिनिंगनंतरच होम डिलिव्हरीची परवानगी दिली जाईल, असेही महापालिकेने म्हटले आहे.
Home delivery has been made mandatorily cashless in Ahmedabad, Gujarat. To prevent spread of #COVID19 through currency notes, it is mandatory to accept digital mode of payments through Unified Payment Interface (UPI)&other platforms:Gujarat Additional Chief Secy Rajiv Kumar Gupta pic.twitter.com/qtN5v2Ac9W
— ANI (@ANI) May 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.