HW News Marathi
क्रीडा

क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी फारुख अब्दुलांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

जम्मू-काश्मीर | क्रिकेट असोसिएशनमध्ये २०१२ साली ११३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर अब्दुल्ला यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल केल्यानंतर अब्दुला यांना वगळता, सर्व आरोपी कोर्टात हजर होते. याप्रकरणी कोर्टाने अब्दुला यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जम्मू-काश्मीर असोसिएशनने एप्रिल २००२ ते डिसेंबर २०११च्या दरम्यान फंड ट्रान्सफर केला. परंतु फंडाच्या रक्कमेत घोटाळा करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात अभाव असल्यामुळे गेल्यावर्षी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेळ मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

swarit

प्रणव धनावडेचा विश्वविक्रम आता सीबीएसईच्या पाठ्यपुस्ताकात

swarit