नवी दिल्ली | सीबीएसईने आज (३० जुलै) दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर केला. यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण, यावर्षी टॉपर्सची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. यावेळी एकूण १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय विद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSE declared class 12th results today
"Results weren't what we were expecting. I was expecting over 80% score but I am disappointed. I wanted to get into a government college but it seems difficult now," says Abhishek Chaudhary, a student in Delhi pic.twitter.com/J1iyRpzznX
— ANI (@ANI) July 30, 2021
यावेळीच्या १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५० हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७० हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २०२० मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.