मुंबई | युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे. ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत, त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे निर्देश दिले आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, रशियाने आमचा विश्वसघात करत आज सकाळी हल्ला केला. ज्याप्रमाणे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात केला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला रशियाने केले असून रशिया आणि युक्रेन हे जागतिक इतिहासाच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. युक्रेनच्या नागरिकांनी आपले घरे आणि शहर वाचवण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्वीट करत जनतेला केले आहे.
We have severed diplomatic relations with Russia. For all those who have not yet lost their conscience in Russia, it is time to go out and protest against the war with Ukraine.
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 24, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.