HW News Marathi
देश / विदेश

20 वर्षांनंतर चीनला प्रथमच वित्तीय तूट

अमेरिका आणि चीन दरम्यान ताणल्या गेलेल्या व्यापारयुद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मागील 20 वर्षांपासून नेहमीच ’सरप्लस’ राहिलेल्या चीनच्या ‘सहामाही’ चालू खात्यामध्ये पहिल्यांदाच तब्बल 28 बिलियन डॉलरची वित्तीय तूट झाली आहे. त्याबरोबरच, तिमाही निकालात देखील 17 वर्षानंतर प्रथमच तुटीची नोंद झाली आहे.

1998 नंतर प्रथमच ही ‘मिड इयर’ तूट झाल्याचे चीनच्या स्टेट ऍडमिनन्स ऑफ फॉरेन एक्सचेंजने (सेफ) म्हटले आहे. ज्या वेळेस देशाच्या वस्तू आणि सेवा आयातीचे मूल्य वस्तू आणि सेवा निर्यात मूल्यापेक्षा जास्त असते त्या परिस्थितीस चालू खात्यावरील तूट झाली असे म्हणतात.

औद्योगिक वस्तू उत्पादनांचा जगाचा कारखाना म्हणून ओळखला जाणारा चीन अजूनही वस्तू व्यापारात आघाडीवर आहे. वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये, वस्तू व्यापार हा 155.9 डॉलर बिलियन धन राहिला आहे.

तर, सेवांच्या व्यापारात मात्र घट झाली आहे. 2018च्या पहिल्या तिमाहीत सेवा व्यापाराची असलेली तूट 73 बिलियन डॉलरवरून 147 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. मागील काही वर्षात चीनने विदेशी पर्यटन, शिक्षण, मनोरंजन आणि परदेशी तंत्रज्ञान आणि पेटंट्सच्या खरेदीवर भर दिल्याने सेवा व्यापारामध्ये तूट दिसून येत आहे.

देशाच्या अर्थव्यवस्था वाढीसाठी प्रामुख्याने वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवर भर देणार्‍या चीनने 2008 च्या वित्तीय संकटानंतर अर्थव्यवस्था वाढीसाठी निर्यातीवर अवलंबून राहण्यापेक्षा आणि देशांतर्गत ग्राहक उपभोगाकडे लक्ष केंद्रित करण्याचा धोरणात्मक निर्णय चीनने घेतला आहे. त्यामुळे 2007 मध्ये जीडीपीच्या 9.9 टक्के असलेला चालू खात्यावरील धन व्यवहार 2017 मध्ये 1.3 टक्क्यांवर येऊन पोचला आहे. त्याबरोबरच, चीनने प्रॅक्टिकल

दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध आणखी प्रबळ होण्याचे संकेत दिल्याने चीनी अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम आणखी जाणवतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चीनी हॅकर्स’च्या कोविड ईमेल पासून सावध, महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना आवाहन

News Desk

‘प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये’, साताऱ्याच्या तिरंदाजाशी मोदींनी मराठीतून संवाद

News Desk

‘भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का!’

News Desk