नवी दिल्ली : फेसबुकवरील माहिती चोरी प्रकरणी केंब्रिज एनालिटिका ही कंपनी बंद करणार असल्याचा निर्णय कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. केंब्रिज एनालिटिका उपकंपन्यासह तिच्या युनिटही लवकरच बंद करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. एनालिटिकाची आणखीन एक मुळची ब्रिटीश कंपनी एसीएस कंपनीही तत्काळ बंद करत असल्याचे संस्थापक नाइजेल ओक्स यांनी सांगितले.
The London-based analytics company #CambridgeAnalytica is shutting down operations effective Wednesday, following the massive #Facebook data breach scandal
Read @ANI story | https://t.co/hysDtiHBNR pic.twitter.com/nbVfd74Bpx
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2018
कंपनीने अमेरिका, भारत आणि इतर या देशातील निवडणुकीच्या काळात फेसबुकवरील डाटाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. या कंपनीच्या कृत्यामुळे फेसबुकला मोठा धक्का बसला. डाटा चोरी केल्यामुळे फेसबुकची मोठी बदनामी झाली असून फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना लोकांची माफी मागावी लागली. त्यामुळे फेसबुकवरील माहिती सुरक्षिततेसाठी फेसबुक काही नवे निर्णयही घ्यावे लागले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.