न्यूयॉर्क | जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. अशातच जर कोणी पाठीवर कौतुकाची थाप मारली की बरं वाटतं. भारताने अनेक देशांना मदत केली. मदत करताना भारतही अनेक उपाययोजना राबवत आहे याचे कौतुक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आरोग्य सेतू अॅपचेही त्यांनी कौतुक केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोदींनी वेळीच उपाययोजना केली त्यामूळे भारतातील कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे. हे संपूर्ण जगासाठी एक आदर्शच आहे. तसेच, भारतातील सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, क्वॉरंटाईन केले, कोरोनाचे हॉटस्पॉट ओळखण्यासाठी चाचण्या वाढवल्या हे सर्व निर्णय कौतुकास्पद आहे, असे बिल गेट्स यांनी पत्रात नमूद केले आहे.
Bill Gates writes to PM Modi: Grateful to see that you’re seeking to balance public health imperatives with the need to ensure adequate social protection for all Indians. https://t.co/DHYub3OriB
— ANI (@ANI) April 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.