HW News Marathi
देश / विदेश राजकारण

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बॅंक ग्राहकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) शी जोडले जाईल. एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कार्यक्रमात बोलताना शहांनी (Amit Shah) ही माहिती दिली. बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा आता जास्त सुधारणा झाल्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालू असणाऱ्या तीनशे योजनांचा लाभ डीबीटी (DBT) द्वारे लाभार्थ्यांना मिळत आहे. पण आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकेतील ग्राहकांना मिळणार आहेत.

“जन, धन योजनेमुळे (Jan-Dhan Yojana) 45 कोटी नवीन लोकांनी बँक खाते उघडले असल्याने त्याचा फायदा थेट बँक ग्राहकांना मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा (Rupay Debit Card) लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे  (Narendra Modi) ‘सहकार से समृद्धी का संकल्प’ मुळेच हा लाभ झाला आहे”, असंही यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितलं.

बँकेच्या या योजनेविषयी बोलताना अमित शहा (Amit Shah) म्हणाले की, “देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीत सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यासोबतच आरबीआय (RBI) आणि नाबार्डने (NABARD) बँकिंगसाठी तयार केलेल्या सर्व मापदंडांवर कृषी बँकांनी स्वतःला आता सिद्ध केले आहे. पूर्वी बँकांकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, आता ते 10 टक्क्यांवर आले आहे.”

पीएम जन धन योजनेंतर्गत (PM Jan-Dhan Yojana) नव्याने उघडण्यात आलेल्या कोट्यवधी खात्यांचे डिजिटल व्यवहारही (Digital Transaction) एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही वाढले आहेत. 2017-18 या वर्षातील डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यात 50 पटीने वाढ झाली आहे. डीबीटीशी (DBT) सहकारी बँका जोडल्या गेल्याने नागरिकांशी अधिक संपर्क वाढून आणि सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळणार असल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk

मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी पंढरपूरची वारी !

News Desk

पवारांनंतर खासदार संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट !

News Desk