HW News Marathi
देश / विदेश

न्यूज पोर्टल्ससाठी नवीन दारे उघडणार , एच डब्ल्यू न्यूज पोर्टल आणि साऊथ लाईव्ह न्यूज पोर्टल एकत्र

महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यामध्ये डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. महाराष्ट्रातील ‘एचडब्ल्यू न्यूज’ने केरळ राज्यातील ५ नामांकित न्यूज पोर्टलपैकी एक ‘साउथ लाईव्ह आणि ‘एचडब्ल्यू न्यूज’ संयुक्त झाले आहे. दोन्ही डिजिटल न्यूज पोर्टल निर्भिड आणि नि:पक्षपातीपणा ही त्यांची खास वैशिष्ट आहे, यामुळे संलग्न झाले आहे.

एचडब्ल्यू न्यूज पोर्टलच्या न्यूज चॅनेलने ठरवलेला साधा सरळ साचा मोडीत काढून नवीन पायंडा रचला आहे.’ दोन्ही पोर्टल समाजाला जागृत करणाऱ्या निर्भिड पत्रकारिता करुन पोर्टल्सचे नव परिवर्तन घडवून आणण्याचे ध्येय ठरवले आहे. ‘आम्ही प्रादेशिक वास्तविकता, प्रामाणिकता आणि सत्यता समजून बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. पुढील वर्षाभरात भारतात आमच्या पोर्टल्स वाचकांची जास्ती जास्त संख्या वाढविणे हे आमचे ध्येय आहे. “आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील बातम्या एकाच पोर्टलवर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कचे अध्यक्ष श्री सुजीत नायर यांनी म्हटले.

” नुकतेच झालेल्या एका सर्वेक्षणात आश्चर्यचकित करणारी बाबसमोर आली आहे. की, देशातील २० कोटी लोक हे डिजिटल मीडियाचा वापर करत आहेत. एचडब्ल्यू न्यूजची ही फक्त सुरुवात आहे. कमी वेळेत लोकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.. कारण दर महिन्याला १.७ कोटीपेक्षा जास्त वाचक आमच्या वेबसाईटला भेट देऊन आमच्या बातम्या शेअर देखील केल्या आहेत. एचडब्ल्यू न्यूज आणि साउथ लाईव्ह दोन्ही संलग्न झाल्यामुळे न्यूज पोर्टलच्या जगतात नवीन इतिहास रचला जाणार आहे.

एच डब्ल्यू न्यूज पोर्टल देशातील राजकीय घडामोडीच्या बातम्या देण्यात आघाडीवर असल्याने एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, ‘एचडब्ल्यू न्यूज नेटवर्क’ सह ‘साउथ लाईव्ह’ दोन्ही पोर्टल हे वेगवेगळ्या शैलीचे असल्यामुळे न्यूजच्या जगासाठी नवीन दारे खुली होणार आहेत. यामुळे नवीन पोर्टल मीडियाच्या धोरणात देखील बदल होणार आहे. साउथ लाईव्हचे अध्यक्ष डॉ. सेबॅस्टियन पॉल म्हणाले की, “साऊथ लाईव्ह इंटरअॅक्टिव्ह न्यूज चॅनल आहे, एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कशी संबंध जोडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आपण ऐकमेकांनी आपल्या विचारधारा शेअर केल्यामुळे यश नक्की मिळणार आहे. या भागीदारीमुळे दोन्ही पोर्टल्स देशात प्रसिध्द होईल असे मत साउथ लाईव्हचे अध्यक्ष डॉ. सेबॅस्टियन पॉल यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

News Desk

यंदा पाऊस ९६ ते १०० टक्के होणार, हवामान विभागाचा अंदाज

News Desk

छत्तीसगडमध्ये चकमक, १० नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk