HW News Marathi
देश / विदेश

Section 377 | आशिषचा चौकटी बाहेरच्या समाजासोबत संघर्ष

अपर्णा गोतपागर। समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने सर्व समलैंगिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर समाजात समलैंगिक व्यक्तींना सन्मान मिळेल. परंतु या आधी या व्यक्तींना स्वत:च्या हक्कासाठी जी धडपड करावी लागली ते विसरता कामा नये.

आशिष बाळीराम भाईर या समलिंगी तरुणाची समाज आणि कुटुंबियांची संघर्षात्मक कथा. मुळचा उरणचा रहिवासी आहे. माझे बालपण हे सर्व सामान्य मुलांसारखेच झाले. मला लहान असताना मुलांसोबत क्रिकेट खेळण्यापेक्षा मुलींच्या भातुकलीसोबत इतर खेळ खेळण्याची आवड होती. मी मुलींसोबत खेळताना पाहून मला माझ्या चाळीत सर्व लोकांनी चिडवायला सुरुवात केली होती.

मी जेव्हा १४ वर्षांचा झालो तेव्हा मला हळूहळू कळू लागले होते की, मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. माझ्या वयाची मुले मुलींकडे आकर्षित होत. परंतु मला मुलींकडे पाहण्यापेक्षा मुलांकडे आकर्षित होत होतो. माझ्या मनातील मुलांकडे पाहण्याची भावना वेगळी होती. परंतु मी जसजसा मोठा होत गेलो तसतसे मला मुलांपेक्षा मुलींसोबत राहणे आवडू लागले. माझ्या आई-वडिलांना कळले होते की, मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. परंतु ते समाज काय म्हणेल, माझे लग्न कसे होईल, माझ्या भविष्याचे काय होणार याच विचारात माझे कुटुंबिय होते.

मी स्वत:ला ओळखले, कुटुंबियांशी संघर्ष

मला वयाच्या १८ व्या वर्षी मी समलैंगिक असल्याचे कळाले. माझ्या कुटुंबियांना कसे सांगावे की, मी समलैंगिक आहे हे मला कळत नव्हते. मी माझ्या कुटुंबियांना वयाच्या २२ व्या वर्षी सांगितले की मी समलैंगिक व्यक्ती आहे. एका वर्षानंतर माझ्या कुटुंबियांनी माझा स्वीकार केला.

माझी आई मला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि त्यांना विचारले की, ऑपरेशन करुन माझा मुलगा व्यवस्थित होईल का? तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, शरीरातील अवयव ऑपरेशन करुन बदलू शकतो. परंतु अंतरआत्म्याचे ऑपरेशन करता येत नाही. यानंतर माझ्या आईला हे कळल्यानंतर तिने मला आनंदाने मी जसा आहे तसे स्वीकारले.समाज मला काय बोलतो याची मी कधी परवा केली नव्हती. परंतु माझ्या कुटुंबियाच्या मनात कुठे तर माझ्याबद्दल दया भावना मला सतत जाणवत होती.

मी समलिंगी व्यक्ती असल्याचे कुटुंबियांना सांगितले. यानंतर मला समाजासोबत माझ्या कुटुंबियांना समाज काय म्हणेल याची भीती वाटत होती. परंतु मला माझ्या कुटुंबियांच्या बोलण्यातून सतत मी समलिंगी असल्याने कोणालाही वाईट वाटते हे जाणवत नव्हते. मात्र समाजात कळाले की, मी समलिंगी आहे, तर काय वाटेल याचा ते सतत विचार करत होते. यातून मला कळले की, मी कोण आहे हे माझ्या कुटुंबियापेक्षा जास्त समाजाला मी काय करतो, कुठे काम करतो हे महत्त्वाचे वाटते.

कलम ३७७ वर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार असल्याचे, न्यायालयाने म्हटले आहे. समाजाने समलैंगिकांना नेहमी हीन वागणूक दिली असून कलम ३७७ यांतील बदलानंतर समाजाचा समलिंगी व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा फार का होईना बदलेल. न्यायालयाच्या या निर्णयाचे पालन समाजात प्रत्यक्षात कधी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | पहिले चार प्रजासत्ताक दिन इथे साजरे झाले

News Desk

पंतप्रधान मोदींचा यूएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Gauri Tilekar

सरकारला चौकशीचा अधिकार नाही, एसआयटी करणार चौकशी

Gauri Tilekar