HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींचा यूएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

अबुधाबी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोदींनी हा पुरस्कार स्वीकारण्याआधी ‘यूएई’चे शासक यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला दोन दिवसांचा फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर काल (२४ ऑगस्ट) अबुधाबीत पोहचले. मोदी काल यूएईहून बहरीनला जाणार असून तिथे ते एका प्राचीन मंदिराचे उद्घाटन करतील तसेच तेथील भारतीय समुदायाला संबोधित करतील.

अबुधाबीत पोहचल्यानंतर मोदींनी यूएईचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. भारत आणि यूएईचे संबंध अधिक दृढ होत आहेत. दुबईला खास शहर बनवण्यासाठी लाखो भारतीयांनी योगदान दिले आहे. तसेच ते काल या ठिकाणी सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत, असे मोदी म्हणाले.

काश्मीरमधील कलम ३७० चा खास उल्लेख केला. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर या निर्णयाचे पडसाद यूएई आणि भारताच्या संबंधावर पडणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊँ च्या प्रतिमेने बनवला जागतिक विक्रम

News Desk

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

News Desk

‘… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली’- नवाब मलिक

News Desk