HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधी-मनमोहन सिंग यांनी घेतली पी. चिदंबरम यांची भेट

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्या भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि गुलाम नबी आझाद यांनी देखील तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. भाजपने चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा ‘परळ ब्रॅंड’ मोहन रावल यांचे निधन

News Desk

अजून एक बँक घोटाळा, व्यापाऱ्याने ३९० कोटीचा चुना लावला

News Desk

पीएसआयचा गळा चिरला, बोटे कापली

News Desk