HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनंती आहे कि, तुम्ही खुदा होऊ नका”, अशी विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. “अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकडे आता सरकारने लक्ष द्यायला हवे. तरच लोक जगतील. नाहीतर येत्या काळात लोक उपासमारीने मरतील”, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, “लॉकडाऊन पुन्हा वाढवू नका”, अशी मागणी देखील यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे विनंती खुदा होऊ नका. सुरुवातीला कोरोनाने सर्वांनाच भीती घातली. मी देखील त्यावेळी भ्यायलो होतो. अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने म्हटले होते कि, ४० टक्के लोक कोरोनाबाधित होतील. त्यानंतर आठवड्याभरातच ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मात्र म्हणाले की, भारतात कोरोना व्हायरस पसरु शकत नाही. कारण भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम आहे. आता ऑस्ट्रेलिया जिंकत असायचे पाहायला मिळत आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आज कोरोनाचा मृत्यूदर २% किंवा त्याच्या थोडा वर असलेला दिसतो. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली, की माणूस जन्माला आला म्हणजे त्याचे मरण निश्चित. त्यामुळे आता विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपण प्रयत्न सुरु करावेत. तरच माणसं जगतील. नाहीतर अशा स्थिती माणसं उपासमारीने मरतील. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे कि, आता आपण पुन्हा लॉकडाऊन वाढवू नका”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

आरोग्यमंत्री झोपले आहेत का? – संभाजी ब्रिगेड

News Desk

पालक आणि वडिलधाऱ्यांना सरकार कडून मदत जाहीर; केंद्र सरकारचे मोठे पाऊल

News Desk