मुंबई | परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी सध्या सोशल साइट यूजर्सच्या निशाण्यावर आहे. प्रियंका यांना ट्विटर हँडलवरून त्यांच्या मुलीच्या रेपची धमकी मिळाली आहे. ‘प्रियांका मी तुझ्या मुली सोबत रेप करू इच्छितो तुझ्या मुलीला माझ्या कडे पाठव.’ असे या ट्विट मध्ये लिहले आहे.
या मिळालेल्या रेपच्या धमकीवरून प्रियंका यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून जय श्रीराम नामक एका अकाउंटवरून गिरीश के १६०५ या ट्वीटर अकाउंट वरून धमकी दिली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबत मुंबई पोलिसांना ट्विट करून मदतीचे आवाहन केले होते. तसेच गोरेगाव पोलीस ठाणे येथे त्यांनी तक्रार देखील नोंदवली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, ही घटना जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचली त्यानंतर जय श्रीराम या ट्वीटर युजरने आपले धमकी देणारे ट्विट डिलीट केले आहे.
प्रियंका चतुर्वेदीच्या मुलीला मिळालेल्या या धमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर टीका केली आहे. तसेच प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हे ट्विट टॅग केले आहे आणि या घटनेचे गांभीर्य घेण्याची गरज आहे कारण अशा पोस्ट करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. असे नमूद करण्यात आले आहे.
Strongly Condemn the Rape Threats to @priyankac19's daughter.
The Troller/Account holder posting such threats must be booked under the law and needs to be punished immediately. Requesting Hon.@Narendramodi Ji to take serious cognizance of this issue.— Supriya Sule (@supriya_sule) July 2, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.