HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 29 हजार 942 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 3 हजार 876 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. परवाच्या तुलनेत (3 लाख 66 हजार 161) नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुन्हा दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 29 हजार 942 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 876 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार ! 

News Desk

PMC बॅंक घोटाळ्याप्रकरणी महाविकासआघाडीचा मोठा निर्णय !

News Desk

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

News Desk