HW News Marathi
देश / विदेश

सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

जम्मू- काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा १ जवान शहीद झाला तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी ३ जवान जखमी झाले आहेत. यातील २ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सीआरपीएफकडून मिळाली आहे.

सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरास जवानांनी घेराव दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांनी सापळा रचून पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

News Desk

निवडणूक आयोग हा दात नसलेला वाघ 

News Desk

शिंदे गटाला नाव-चिन्हा देण्याचा निर्णय योग्य; निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात पाठविले उत्तर

Aprna