HW News Marathi
देश / विदेश

आज ठरणार शबरीमाला याचिकेवरील सुनावणीची तारीख

नवी दिल्ली । शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात ही फेरविचार याचिका दाखल करण्यात आली. या याचिकांच्या सुनावणीची तारीख आज (२३ ऑक्टोबर) मंगळवारी ठरणा आहे.२८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शबरीमालामध्ये महिलांना प्रवेश द्यावा हा निर्णय दिला होता.

घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल केलेली याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. मॅथ्यूज नेदुम्परा यांनी केली आहे. अशा १९ याचिका न्यायालयात दाखल झाल्या असून त्यांच्या सुनावणीच्या तारखेबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के. कौल यांचे खंडपीठ आज निर्णय घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरदेखील महिलांना अद्याप मंदिरात प्रवेश करू दिला नाही

केरळच्या यंग लॉयर्स असोसिएशनने बंदीविरोधात २००६मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या ११ वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असून, शबरीमाला हे सार्वजनिक मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सत्ता हा नात्यांचा धागा नसतो’, मोदी-उद्धव भेटीवर सामनाच्या अग्रलेखात काय लिहिले आहे?

News Desk

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? – जयंत पाटील

News Desk

रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी!

News Desk