HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घटवण्याचा दाऊदचा कट

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पाकिस्तानात राहणारा दाऊदचा भाऊ आणि भारतामधील दाऊदचा गुंड यांच्यातील फोनवरील संभाषण मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केले असून त्यातून बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती पोलिसांना मिळाली. दाऊद आखत असलेल्या या कारस्थानाची माहिती मुंबई पोलिसांकडून केंद्र सरकारला देण्यात आली आहे.

भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर दाऊदचे लोक सक्रीय असल्याचे फोनवरील संभाषणातून समोर आले आहे. २४ वर्षांनंतर मुंबईत पुन्हा साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या दाऊदच्या गुंडांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इकबाल कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागितल्याचा आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी इकबालला ताब्यात घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा सूड उगवण्याचा दाऊदचा मनसुबा दिसत आहे. तो कट उधळून लावण्याचे पोलिसांपुढे आवाहन आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून ‘समझौता एक्स्प्रेस’ पुन्हा पाकिस्तानसाठी रवाना होणार

News Desk

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

News Desk

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

तिवरे धरण दुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार जबाबदार !

News Desk

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांची धडक होऊन भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

News Desk

नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट

News Desk