नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत थेट भाष्य करणाऱ्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांचा मुलगा रोहित याने गुरुवारी (१८ जानेवारी) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Haryana: Rohit, 22-year-old son of Tej Bahadur Yadav (BSF constable who was dismissed from service after he had released a video last year on quality of food served to soldiers) found dead at his residence in Shanti Vihar, Rewari. pic.twitter.com/sVhY5ve6Ju
— ANI (@ANI) January 17, 2019
नेमके काय घडले ?
बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेज बहादूर यादव यांचा मुलगा रोहित (२२ वर्षे) याचा मृतदेह गुरुवारी रेवाडीतील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. रोहितची आई संध्याकाळी कार्यालयातून घरी आली तेव्हा रोहितची खोली बंद होती. खूप वेळ प्रयत्न करुनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रोहितची खोली उघडली तेव्हा रोहित पलंगावर मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या हातात एक पिस्तुलदेखील होते. हे पिस्तूल परवानाप्राप्त होते किंवा नाही याबाबतचा तपास सध्या सुरु आहे.
जवान तेज बहादूर यादव यांनी भारतीय लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत भाष्य केले होते. यावरून एवढा मोठा वाद निर्माण झाला होता कि पंतप्रधान कार्यालयाने देखील याची दखल घेतली होती. बीएसएफकडून शिस्तभंगाची कारवाई करत जवान तेज बहादूर यादव यांना निलंबित केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.