मुंबई । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी केली आहे. ही घोषणा म्हणजे महिलांना समान संधी व सन्मान देण्यासाठी टाकलेलं क्रांतीकारी पाऊल असल्याचं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने यापूर्वीही अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही केलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातही महिलांना सहभागी करून घेतलं होतं. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने हेच आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत केलं. संरक्षण दलात महिलांना संधी देण्याचा निर्णयही राजीव गांधी यांनीच घेतला. महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा निर्णयही काँग्रेसच्या सरकारनेच घेतला आहे.”
काँग्रेसने महिलांसाठी राजकारणात हे महत्त्वाचं पाऊल उचललं!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.