मुंबई । पेट्रोल-डिझेल किंमतीत सलग सहाव्या दिवशी घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात १० पैशांची तर डिझेलमध्ये ८ पैशांची स्वत झाले आहे. मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रति लिटर मागे ८६ रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलसाठी प्रति लिटर ७८.४६ रुपये झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे
Petrol, diesel prices dropped for the sixth straight day on Tuesday bringing relief to customers who have been reeling under high fuel prices
Read @ANI story | https://t.co/fQtZ0yyODq pic.twitter.com/qm2SUSOtgA
— ANI Digital (@ani_digital) October 23, 2018
पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाचव्या दिवशी स्वस्त झाले होते. मुंबई काल (२२ ऑक्टोबर) पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २८ पैशांची घट झाली होती. मुंबईकरांना पेट्रोलसाठी ८६.९१ प्रति लिटर, तर डिझेल ७८.५४ प्रति लिटर मागे पैसे मोजावे लागले होते. तसेच दिल्लीत पेट्रोल ८१.४४ रुपये तर डिझेल ७४.९२ रुपये प्रति लिटर झाले होते. म्हणजेच दिल्लीत पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २७ पैशांनी घटले होते. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होत असल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.