HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

नवी दिल्ली | मुंबईत आज (शनिवार) पेट्रोल ३८ पैसे तर डिझेल १३ पैसे प्रति लिटरने एवढे स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७.४६ रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लिटर ७९.०० रुपये झाला आहे. देशात अनेक दिवसांपासून होणाऱ्या इंधन दरवाढीनंतर आता गेल्या तीन दिवसांत इंधनाच्या किंमतींमध्ये घट पाहायला मिळत आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनकपात होत असली तरी दिल्लीत मात्र अद्याप इंधनदरवाढ कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल १२ पैशांनी प्रति लिटरमागे महागले आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर ८१.९९ रुपये तर डिझेल प्रति लिटर ७५.३६ रुपये एवढे झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय चलनाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत आहे.

देशात गेल्या अनेक दिवसांत मात्र दर दिवशी होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला होता. देशातील अनेक राज्यांत पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी ओलांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनकपातीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला

swarit

पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

News Desk

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

News Desk